पुण्याच्या भोरमधील आदिवासी कातकरी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी, आदिवासी कातकरी समाजातील नागरिकांचं भोर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाले. प्रधानमंत्री जन मन योजने अंतर्गत मंजूर असलेली घरकुल तात्काळ मिळावीत, आधारकार्ड, रेशनकार्ड, जात दाखले आणि महत्वपूर्ण कागदपत्रे, तातडीने शिबिर आयोजित करुन काढून देण्यात यावीत, शाळा प्रशासन आधारकार्ड साठी सक्ती करत असल्यानं, शासन पातळीवर विद्यार्थीचे नुकसान होणार नाही अशी तजवीज करावी.