ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री पंकजा मुंडे, माजी खा. हिना गावित आणि अॅड. रोहिणी खडसे यांच्याविषयी अत्यंत गलिच्छ, अश्लील आणि आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नंदुरबार येथील विजय चौधरी यांच्याविरोधात मुक्ताईनगर आणि रावेर येथे सर्वपक्षीयतर्फे भव्य प्रवर्तन चौक ते तहसील कार्यालयपर्यंत जनआक्रोश निषेध मोर्चा काढण्यात आला.