नंदुरबार जिल्ह्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. 21 एप्रिलपासून विविध मागण्यांसाठी सुरू झालेल्या या संपाला जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून आरोग्य, शिक्षण आणि महसूल विभागातील हजारो कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. परिणामी शासकीय कार्यालये ओस पडली असून कामकाज ठप्प झाले आहे.