बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पासाठी 1972 मध्ये कमकासूर, सितेकसा व सुसूरडोह येथील आदिवासींची जमीन संपादित करण्यात आली. मात्र योग्य मोबदला, पुनर्वसन, जमिनीच्या बदल्यात जमीन, नोकरी व घरासाठी मदत या मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. याविरोधात तिन्ही गावांच्या ग्रामस्थांनी 18 मार्च रोजी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता, मात्र प्रशासनाने इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यानं अखेर ग्रामस्थांकडून जल समाधी आंदोलन करण्यात आलं.