ऊस दर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणार्या दहा ट्रॅक्टरचे टायर फोडले. मध्यरात्री पंढरपूर तालुक्यातील सुपली आणि भंडीशेगाव येथे ऊसाचे ट्रॅक्टर अडवून आंदोलन केले. यामध्ये वाहन मालकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. पहिली उचल पाच हजार द्यावी या मागणीसाठी आंदोलन केले.