पालघर येथे जल,जंगल,जमीनच्या ज्वलंत प्रश्नावर मार्क्सवाद कम्युनिस्ट पक्षाचा नेतृत्वात निघालेला मोर्चा पालघर जवळील मनोर येथे वस्तीला होता.मूलभूत प्रशनाच्या मागणीसाठी थंडीच्या कडाक्यात रात्रभर मोर्चेकरी मनोर मध्ये वस्तीला होते. आदिवासी समाजाचे तारपा नृत्य करीत मोर्चेकरांनी, रात्र घालवली आहे. त्याच ठिकाणी स्वयंपाक बनवून, सर्वांच्या जेवणाची व्यवस्था ही करण्यात आली होती. आजचा दुसरा दिवस असून मार्क्सवादी पक्षाचे लाल वादळ दुपारी 2 च्या सुमारास पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.या मोर्च्यात 30 हजारच्या वर आदिवासी बांधव सहभागी झाले आहेत. यात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग आहे.