जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांची यादीत समावेश करून नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.