कणकवली तालुक्यातील नागवे सांगवेकरवाडी येथील सार्वजनिक विहीर कोसळली असून यामुळे या वाडीतील नागरिकांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विहिरीमध्ये अनेक लोकांनी विद्युत पंप टाकून घरापर्यंत थेट पाणी नेले होते. विहीर कोसळल्यामुळे हे सर्व पंप विहिरीमध्ये गाडले गेले आहेत.