पुण्यातील विश्रांतवाडीत एअरपोर्ट रोडवरील शांती होंडा रोड क्रमांक 1 येथे रस्त्याच्या मधोमध असलेली मुख्य पिण्याच्या पाण्याची लाईन फुटली असून, यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. संपूर्ण रस्त्यावर पाणी वाहत असून परिसराला अक्षरशः नदी-नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या घटनेबाबत तक्रार देऊनही महानगरपालिकेचे कोणतेही जबाबदार अधिकारी अद्याप घटनास्थळी पोहोचलेले नाहीत.