पुण्याच्या भोर तालुक्यातील वेनवडी गावात, ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त जंगी कुस्त्यांचा आखाडा रंगला होता. कुस्त्यांमध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या 200 हून अधिक मल्लांनी सहभाग घेतला होता. यावेळी कुस्ती क्रीडा प्रकरातील सर्व वजनी गटातील कुस्तीपटूंच्या कुस्त्या रंगल्या. ग्रामस्थ मंडळाकडून भरविण्यात आलेला हा निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा पाहण्यासाठी परिसरातील कुस्ती शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.कुस्तीचे फड जिंकणाऱ्या स्पर्धकांसाठी चांदीच्या गदेसह एक हजार रुपयांपासून ते 1 लाख 51 हजार रुपयांपर्यंत रोख बक्षिस ठेवण्यात आले होते.