पुण्याच्या खेड तालुक्यातील चास कमान धरणाच्या भिंतीला समांतर असणाऱ्या भीमा नदीवरील पुलाला गेल्या तीन वर्षांपासून मोठे भगदाड पडले आहे. चास कमान धरणातून पाण्याचा विसर्ग सोडल्यानंतर येथे मोठ्या संखेने पर्यटक या पुलावरून वर्षाविहार करण्यासाठी येत असतात. यातच पूल वाहतुकीस धोकादायक झाला असूनही या पुलावावरून वाहतूक सुरूच आहे. वीस वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला असून या पूर्वीही पुलावर विविध ठिकाणी भगदाड पडल्याने पुलावरून होणाऱ्या वाहतुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.