पुणे जिल्ह्यातील नारायणगावच्या वारूळवाडी येथील कॉलेज रोड परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास हा बिबट्या रस्त्यावर फिरताना दिसला आहे. ज्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे नागरिकांनी रात्रीचे बाहेर पडणे टाळावे असे आवाहन वन विभागाने केले आहे.