पुण्याच्या राजगड तालुक्यातील निगडे बुद्रुक गावातील एका शेतातल्या विहिरीत, पाण्याच्या शोधार्थ आलेला बिबट्या पडल्याची घटना घडली आहे. शेतकरी शिवाजी बांदल शेतीला पाणी देण्यासाठी विहिरीवर मोटर चालू करण्यासाठी गेले असताना विहिरीत बिबट्या पडल्याच त्यांच्या निदर्शनास आलं. शेतकऱ्यांनी ही माहिती वन विभागाला दिल्यानंतर, वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू टीमच्या सदस्यांच्या मदतीने बिबट्याला विहिरीतून काढले बाहेर. वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे बिबट्याचा जीव वाचला असून, बिबट्या पकडला गेल्यानं परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार सापडलेला बिबट्या वयाने लहान असून परिसरात त्याची आई किंवा इतर बिबटेही असण्याची शक्यता नाकारता येत नाही..त्यामुळं वनविभागाकडून सतर्क राहण्याच आवाहन स्थानिकांना करण्यात आलंय. पकडलेल्या बिबट्याला सध्या बावधन येथील वन्यजीव उपचार केंद्रात पाठविण्यात आले आहे.. बिबट्यावर प्राथमिक औषधं उपचार करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार..