पुण्याच्या भोरमध्ये ग्रामदैवत वाघजाई देवीच्या यात्रेनिमित्त पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात देवीच्या काठी-पालखीची मिरवणूक काढण्यात आली.पारंपारिक ढोल-ताशांच्या तालावर आणि वाद्यांच्या गजरात भोर शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक निघाली. यावेळी पहाटे देवीची विधिवत पुजा आणि अभिषेक करण्यात आला.त्यानंतर काठी नाचवत मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली. प्रत्येक चौकात महिलांनी देवीच्या पालखीची विधीवत पूजन केले. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त वाघजाई मंदिर ट्रस्टच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.