शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार गटाकडून पुण्यात खास बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर शरद पवार आणि अजित पवार या दोघांचे फोटो असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे 'घड्याळ' चिन्हही ठळकपणे दिसत आहे. करण गायकवाड यांच्या पुढाकाराने लावलेल्या या बॅनरमुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे, भविष्यातील संकेत म्हणून याकडे पाहिले जात आहे.