पुत्रदा स्मार्त एकादशीनिमित्त आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराला रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. देशी-विदेशी फुलांनी माऊलींचा मुखवटा मनोहारी दिसत आहे. माऊलींचे हे रूप पाहण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून, आळंदी नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे.