पुणे - भोर येथील अंबाबाई देवीच्या यात्रेनिमित्त देवीच्या काटी पालखीची मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. बेंजो आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर भोर शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फाटक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. या मिरवणूकीत पुरुषांबरोबरच महिलाही,मुलेही मोठ्या उत्साहात सहभागी झाली होती. मिरवणूकी दरम्यान आसपासाचा परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला.