बिबवेवाडी परिसरात आज सकाळच्या सुमारास मोठा अनर्थ टळला.बांधकामाच्या साईटवर जात असताना भरगच्च भरलेला ट्रक उतारावर नियंत्रण सुटल्याने मागे घसरत आला. या ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोला धडक दिली आणि थेट योगायोग सोसायटीच्या आवारात घुसला. ही घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. मात्र योगायोग सोसायटीच्या संरक्षक भिंतीसह काही भागाचे नुकसान झाले.