अंगारक चतुर्थी निमित्त अष्टविनायक लेण्याद्रीच्या गिरिजात्मज बाप्पाचा गाभारा आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी सजविण्यात आला असून लाडक्या बाप्पाला केळींचा महानैवद्य दाखवण्यात आला. चतुर्थीनिनित्त सकाळपासूनच लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. देवस्थान ट्रस्टकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.