एकादशी निमित्त आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली असून भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आळंदी येथील परिसर फुलांच्या मनमोहक सजावटीने नटला आहे. मंदिराच्या सभामंडपासह समाधी परिसरात विविध रंगांच्या ताज्या फुलांनी सुंदर आरास करण्यात आली आहे.राज्यातून आलेले वारकरी आणि भाविकांसाठी ही पुष्पसजावट विशेष आकर्षण ठरत असून भाविक भक्तिभावाने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होत आहेत. फुलांच्या मनोहारी सजावटीमुळे संपूर्ण मंदिर परिसराला दिव्य आणि प्रसन्न स्वरूप प्राप्त झाले आहे.