पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी परिसरात बिबट्याच्या बछड्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कामगारांनी बछड्याचा फोटो काढला असून, मादी बिबट्याही जवळ असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिबट्याचा वाढता वावर आणि पाळीव प्राण्यांवरील हल्ले पाहता, वनविभागाने परिसरात जनजागृती सुरू केली असून नागरिकांना सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.