पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील शिवगंगा नदी पुलाजवळ, विद्यार्थ्यांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. श्री शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी, मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान अंतर्गत वनराई बंधारा बांधणे या उपक्रमातून या ठिकाणी येऊन श्रमदान केले.