नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी नराधम भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा मिळाल्यानंतर नसरापुर गावातही चिमुकलीला न्याय मिळाला अशी भावना पाहायला मिळाली आहे.गावातील महिलांनी आरोपीला शिक्षा मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा, न्यायालय आणि वकिलांचे आभार मानले आहेत. फाशीच्या शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी.आरोपीला आता कोणीतही माफी देऊ नये अशी भावना महिलांनी बोलून दाखवली आहे.