पुणे : भोर तालुक्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. उष्णतेपासून कोंबड्यांचे संरक्षण करण्यासाठी पोल्ट्रीव्यवसायिकांना कसरत करावी लागत आहे. पोल्ट्रीच्या पत्रा शेडवर स्प्रिंकलरद्वारे पाण्याचे फवारे मारून गारवा निर्माण केला जातोय.