पुण्याच्या भोरमधील जिजामाता शाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूपासून पक्षांसाठी घरटी बनविली आहेत. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूपासून छोटी- मोठी घरटी तयार केलीयत. तर घरट्यांच्या कडेला छोट्या भांड्यात कृत्रिम पाण्याचे स्त्रोत निर्माण केले आहेत.