उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे. शाळा सुरू होणारं असल्यानं पुण्याच्या भोरमध्ये शालेय साहित्याची खरेदी करण्यासाठी पालकांनी आणि मुलांनी काल रात्री उशिरापर्यंत दुकानांमध्ये गर्दी केली होती. वह्या, पुस्तके, दप्तरे, वॉटर बॉटल, कंपास आणि इतर साहित्याची खरेदी करण्यासाठी दुकानांवर झुंबड उडाल्याचे चित्र होतं.