पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये जागावाटपाचा तिढा कायम आहे. महायुतीमध्ये शिवसेना 35 जागांसाठी ठाम असून, भाजपने केवळ 15 जागांचा प्रस्ताव दिला आहे. भाजपने 125 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. यामुळे महायुतीसमोर जागावाटपाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.