पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील कारेगाव येथे ग्रामदैवत श्री म्हसोबा माऊली यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. भर उन्हात शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तर मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात बैलगाडा शर्यती पार पडल्या.