वडगाव मावळ तहसील कार्यालयात जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग सुरू केली असून,अर्ज भरण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे. अर्जांची छाननी तसेच सर्व कागदपत्रांची पूर्तता करून उमेदवार आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख यांच्या दालनात दाखल करत आहेत.