पंढरपूरसाठी पुणे विभागानं आषाढी वारीसाठी विशेष नियोजन केलं आहे. पुणे विभागाकडून 750 विशेष बस सोडण्यात येणार आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने लाडक्या पांडुरंगाच्या भेटीला जाण्यासाठी भाविकांची पुणे विभागातील मुख्य एसटी बस स्थानकांसह जिल्ह्यातील सर्व स्थानकात गर्दी होते. यंदाही गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे एसटी विभागाने पुण्यातून पंढरपूर साठी साडेसातशे गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.