उत्तर पुणे जिल्ह्यात पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली. मात्र आता पिकांच्या उगवणी आणि वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने दडी मारल्याने पिके करपण्याची भीती निर्माण झाली आहे.