पुण्यात निवडणुकीच्या निकालापूर्वीच प्रभाग क्रमांक ९ मध्ये विजयाचे बॅनर लावल्याने चर्चांना उधाण आले आहे. लहू बालवडकर यांच्या संभाव्य विजयाचा दावा करणारे हे बॅनर सचिन दळवी यांच्या वतीने लावण्यात आले आहेत. अधिकृत निकाल येण्याआधीच झालेल्या या बॅनरबाजीमुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.