आज दुपारी चार वाजता एक युवक गरवारे पुलाखाली नदीपात्रात अडकला असल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात प्राप्त होताच तात्काळ एरंडवणा अग्निशमन केंद्राचे वाहन रवाना करण्यात आले होते.घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, सदर ठिकाणी एक तरुण मधोमध पाण्याच्या प्रवाहात एका खांबाला धरुन उभा आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जवानांनी क्षणाचा ही विलंब न करता पाण्यात उतरुन लाईफ जॅकेट, रिंग आणि रश्शी याचा वापर करुन त्याला धीर देत त्याच्यापर्यंत पोहोचले.