पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात फाकटे आणि इनामगावात दोन मादी बिबट्या जेरबंद झाल्या. ८ वर्षीय आणि २ वर्षीय या बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकल्या. यामुळे बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे त्रस्त असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. दोन्ही बिबट्यांना वैद्यकीय तपासणीसाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात पाठवले जाईल.