शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात २ ते २.५ वर्षांची मादी बिबट्या जेरबंद झाली आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू असल्याने वनविभागाने अनेक पिंजरे लावले आहेत. या परिसरात आतापर्यंत २६ बिबट्यांची यशस्वी पकड झाली असली तरी, अजूनही बिबट्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे.