पुणे : गॅस दर वाढ आणि टंचाई मुळे पिंपरी चिंचवड मधील जवळपास १५ टक्के छोटी मोठी हॉटेल बंद पडली असताना आता मोठ्या हॉटेल व्यावसायिकांनाही सतत वाढत असलेले गॅसचे दर त्याच बरोबर पालेभाज्या आणि चिकनचे दर वाढल्याने मोठा फटका बसत आहे.. हॉटेल व्यावसायिकांनी खाद्य पदार्थांचे दर २० टक्क्यांनी वाढवण्याचा विचार सुरू केलाय. त्यामुळे ग्राहकांना ही मोठा फटका बसण्याची चिन्हं आहेत.