पुण्याच्या इंदापुरातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यावर ऊस वाहतूकदारांनी ठिय्या आंदोलन छेडले आहे. या ठिकाणी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. 2025 - 26 च्या हंगामातील ऊस वाहतूकदारांचे वाहतुकीचे आणि तोडणीचे पैसे अद्याप कारखान्याने दिलेले नाहीत. वाहतूकदारांच्या लाखो रुपयांच्या रकमा कारखान्याकडे अडकल्या आहेत.