पुण्यातील मावळमधील कुंडमळा या ठिकाणचा इंद्रायनी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुलावर दोन दुचाकी समोरा-समोर आल्यानं वाद झाला अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. तर हा वाद पाहण्यासाठी गर्दी झाली अन् कुंडमळा पूल कोसळला असल्याची माहिती आता समोर येत आहे.