सोलापूर जिल्ह्यातील अपघाताच्या घटनेनंतर रस्त्यालगत असणाऱ्या विहिरींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील महुडे मार्गावरील शिंद गावाच्या हद्दीत रस्त्यालगत असणारी खोल विहिरी अशाच प्रकारे दुर्घटनेला आमंत्रण देणारी ठरत आहे. विहिरी रस्त्यालगत असल्याने वाहन विहिरीत पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.