शिरूरमध्ये नुकताच वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.या पावसामुळे एका पटांगणामध्ये मोठ्या प्रमाणावर चिखल झाला. दरम्यान, या चिखलामध्ये एक जीप गाडी रुतून बसली होती. चालकाने गाडी बाहेर काढण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र चिखल जास्त असल्याने चारचाकी जागेवरून हलत नव्हती. अखेर,त्या गाडीला ट्रॅक्टरच्या सहाय्याने ओढून बाहेर काढावे लागले.