जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक परिसरात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही वन विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष सचिन थोरवे यांनी थेट बिबट्याच्या पिंजऱ्यात बसून आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.