पुणे जुन्नर येथे काढणीला आलेला कांदा शेतातच पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचं वर्षभराचं अर्थकारण कोलमडलंय. मोठा खर्च, काबाडकष्ट आणि आशा ही सारी स्वप्न उराशी असताना पण अवकाळी पावसाने सगळं पाण्यात गेलं. शेतात उभा असलेला कांदा अक्षरशः सडू लागलाय.