पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सध्या एका विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सोपान दुर्गुडे यांनी आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्यात कुठलीही भेट वस्तू न स्वीकारता किंवा कुणालाही भेटवस्तू न देता कॅन्सरवर मात करणाऱ्या लक्ष्मीतरु वृक्षाची विवाह सोहळ्याला येणाऱ्या प्रत्येकाला भेट दिली. कॅन्सर रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या 3066 लक्ष्मीतरु वृक्षांचे विवाह सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना नातेवाईकांना वाटप करून एक नवा आदर्श समाजापुढे घालून दिला. शिवाय कॅन्सर विरोधी मोहिमेत सोपान दुर्गुडे यांनी यानिमित्ताने सहभाग घेतला. या उपक्रमाचे जिल्ह्यातून सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या विवाह सोहळ्याला स्थानिक आमदार शरद सोनवणे देखील उपस्थित होते