भिमा नदी प्रवाहित झाल्याने शेतकरी, नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील पाणीसाठ्यातही वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे खेड आणि शिरूर तालुक्यातील पाणी आणि शेती व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.