पुण्याच्या खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे कुत्र्याची शिकार करणारा बिबट वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या बिबट्याने पाळीव कुत्र्यांवर हल्ले करून परिसरात दहशत निर्माण केली होती. बिबट्या पकडल्याने स्थानिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून, आता सुरक्षिततेची भावना वाढली आहे.