पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कडूस धायबर शिवारमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. रात्रीच्या वेळी घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने दुचाकीवरून उडी मारण्याचा प्रयत्नही केला, ज्यामुळे परिसरातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.