पुण्यातल्या कोंढवा परिसरात अवैध दारूवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना बंद कपाटात लाखोंची रोकड सापडली. या पैशांची तातडीने मोजणी सुरू करण्यात आली. नोटांचे मोठे बंडल्स पाहून पोलीसही थक्क झाले. ही रोकड नेमकी कशासाठी होती, याचा तपास आता पोलीस करत आहेत.