पुण्यात कोयता गँगची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. विमाननगर परिसरात फुकट वस्तू न दिल्याने या टोळक्याने पान टपरीवर कोयत्याने हल्ला केला. अल्पवयीन मुलांचा समावेश असलेल्या या घटनेमुळे स्थानिक व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.