आळंदीमध्ये वैष्णवांचा मेळा जमलाय. आळंदी मध्ये कार्तिकी यात्रेला सुरुवात झाली असून आज कार्तिकी एकादशीनिमित्त आणि 17 तारखेला होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.