पुण्याच्या खेड तालुक्यातील बुरसेवाडीत बिबट्याने लोकवस्तीत घुसून पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. कुत्र्याने झुंज देत जीव वाचवला, त्यामुळे बिबट्याची शिकार हुकली. हा थरारक प्रसंग सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण असून, वनविभागाला माहिती देण्यात आली आहे. हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.